इतिहास

इचलकरंजी ही महाराष्ट्राची "मॅचेष्टर” नगरी म्हणून ओळखली जाते कारण इथे कापड निर्मीती व्यवसाय मोठ्या प्रमाणात आहे. येथील युवक हि हा व्यवसाय उत्सुकतेने करतात. परंतू आर्थिक प्रश्न मोठा असल्याने व्यवसायासाठी अडचणी येत असतात. हाच नेमका प्रश्न घेऊन इचलकरंजीचे माजी उपनगराध्यक्ष मा.श्री.आप्पासाहेब बाबुराव मगदूम, आणि त्याचे समाजातील सहकारी श्री.बाळासाहेब सिद्धाप्पा चोगुले, श्री कुंतीलाल पाटणी,.श्री.सुभाष काडाप्पा सर, डॉ.पी.जे.बडबडे, श्री.बाळासाहेब पा.चोगुले, श्री.रवींद्र देवमोरे, श्री.बापुसो जमदाडे, असे बराच व्यक्तींना एकत्रित करून एक आर्थिक संस्था(बँक)काढनेचे विचार केला.आणि दि.१६.१.१९९६ रोजी जैन धर्मातील प्रथम तिर्थंकर “श्री आदिनाथ भगवान” यांचे नावाने “श्री आदिनाथ को-ऑप.बँक लि.,इचलकरंजी” बँकेचे रजिस्टर रजिष्ट्र्शन केले.

बँकेचे मुख्य कार्यालय हे लक्ष्मी मार्केट,इचलकरंजी तेथे भाडे तत्वावरएक जागा पाहून बँकेची सुरुवात केली.बँकेचे प्रथम चेअरमन म्हणून संस्थापक श्री आप्पासाहेब बाबुराव मगदूम यांची दि.०५/०२/१९९६ रोजी एकमताने निवड करणेत आली.बँकेने सुरुवातीपासून बँकेच्या सभासदांना विश्वासात घेऊन सर्व कामकाज केले आहे.बँकेने सर्व प्रथम सन २००१ साली बँक संगणीकृत करूनबँकिंग सेवा देण्यास सुरु केले.

बँकेने अल्पावधीतच इचलकरंजीच्या मध्यवर्ती ठिकाणी,अडत पेठ,जनता चौक,तेथे ३ हजार स्केव.फुट जागा घेतली व तेथे बँकेच्या स्वमालकीची इमारत उभी केली आहे.बँकेचा विस्तार वाढवणेसाठी बँकेने २००३ साली जयसिंगपूर शाखा ,व २०१२ साली सांगली नाका शाका,इचलकरंजी तेथे चालू केली आहे.

बँकेच्या कारकिर्दीत कधीही निवडणूक झाली नाही.प्रत्येक निवडीवेळी एकोप्याने , सर्वाना संधी देऊन बिनविरोध निवड केलेल्या आहेत.बँकेने सुरुवातीची 12 वर्षं संचालक मंडळ हि कोणतेही मिटिंग भत्ता ,प्रवास भत्ता न घेता एक आदर्श इतर बँकेसमोर ठेवला आहे.

बँकेला सुरुवातीपासून ऑडीट वर्ग “अ” मिळाला आहे. स्पर्धेच्या युगात ठिकाण्यासाठी बँकेने सन २०१३ रोजी इचलकरंजी शहरात लहान बँकेत सर्वप्रथम CBS Banking कोअर बँकिंग प्रणाली सुरु केली आहे.त्यामुळे बँकेच्या ग्राहकाला कोणत्याही शाखेत रोख रक्कम काढता येऊ लागली आहे. तसेच बँकेने सी.टी.एस.चेक बुक, SMS बँकिंग सुविधा चालू केली, लॉकर सेवा चालू केली आहे.,बँकेने IFSC CODE मिळून RTGRTGS/NEFT सेवा चालू केली आहे.अशा अनेक सुविधा एकाच छताखाली मिळत असल्याने बँकेचा नावलौकिक वाढलेला आहे.

श्री आदिनाथ को-ऑप.बँक लि.इचलकरंजी तर्फे आपले सहर्ष स्वागत आहे. सन २०१२-२०१३ सालातील डिव्हिडंट वाटप चालू आहे तरी सभासदांनी त्यांचा डिव्हिडंट घेऊन जावे हि नम्र विनंती. नवीन आकर्षक ठेवीचे व्याज दर पहा व एक वेळ आपल्या जवळच्या शाखेत आवश्य भेट द्या. * विनम्र व तत्पर सेवेची हमी * विशेष बातम्या
टे. नं.: (०२३०) २४३०१५०,२४३२९०४,२४३०५९६